राज्य

मुरूमाचे अवैध उत्खनन व परिवहन प्रकरणी २,४१,९४,७००रूपये खजानादाखल करण्याचे आदेशकाटोल तहसीलदार यांचे आदेशरिंगणाबोडी प..ह. ६७चे हरदोली शिवारातील प्रकरण

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*

कोंढाळी -वार्ताहर दुर्गा प्रसाद पांडे

नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गाच्या काटोल तालूक्यातील हरदोली शिवारातील प ह क्रं ६७अंतरग शेत सर्व्हे क्रमांक ०९आराजी०३.०७हे आर मधून पोकलेन द्वारे मुरमाचे उत्खनन करून टिप्पर द्वारे नियमबाह्य परिवहन करून शेत सर्व्हे क्रमांक १०/१ आराजी मधे पोकलेन ने मुरमाचे उत्खनन करून टिप्पर द्वारे वाहतूक करून ५००ब्रास मुरुम उत्खनन करन्या आले.‌तसेच सर्हे क्र १०/१ आराजी १.५५हे आर आराजी मधे ५००ब्रास ‌मुरूमाचे उत्पादन करून खड्डे बूजवून जमिनीचे सपाटीकरण प्रकरणी सदर प्रकरण कोर्ट विद्यमान राजू रणवीर तहसीलदार काटोल यांचे कार्यालयात रा.मा. क्रं.१६/एम.एन.एल.-३७/२०२२-२३ मौजा रिंगणाबोडी प.ह.६७ समक्ष पंजिबद्घ करण्यात आले होते.


सदर प्रकरणी गैर अर्जदार १)तेजंदर बलबिल रेणू,२) नाशिक काशिनाथ शामकुंवर दोन्ही राहणार नागपूर
यांना उप अधिक्षक भूमी अभिलेख काटोल कार्यालयाचे मोजनी अहवालावरून मोका चौकशी अहवाल व दाखल प्रकक्षण दस्तावेज पडताळीणी अंती आलेल्या निष्कर्षावरून गैर अर्जदार यांनी गौणखणिजाचे अवैध उत्खनन करून परिवहन प्राधिकरणी दोषी आढळल्यावरून गैर अर्जदार हे दंडात्मक कारवाईस पात्र ठरत असल्याने कोर्ट विद्यमान राजू रणवीर तहसीलदार काटोल यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम-४८(७) नुसार २९८७ब्रास मुरमाचे उत्खनन केल्या प्रकरणी २,२४,०२,५००/-दंड+
अधिकार शुल्क १७,९२,२००/-असे एकूण-२,४१,९४,७००रू दंड खजिनादाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button