राजकीय

मा. राहुलजी गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकवल्याविरोधात तीव्र आंदोलन

राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजपा सरकार हतबल – मोहन पंचभाई

आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करणारे काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मा. राहुलजी गांधी यांच्यावर खोटा खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द करत त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. याविरोधात श्री मोहन पंचभाई भंडारा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही विरोधी मोदी सरकारच्या विरोधात भंडारा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने मा. गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करत खटला दाखल केला होता, या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने मा. राहुलजी गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला राहुलजी गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने या विरुद्ध मा. गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी आज मा. गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला असून मा. राहुलजींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. भाजपाविरोधात बोलणा-यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे. मा. राहुलजी गांधी यांनी मोदी आणि अदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली.

हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. याविरोधात आज भंडारा जिल्हा मुख्यालयी कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी

श्री मोहन पंचभाई, जी प अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, सभापती रमेश पारधी, मदनजि रामटेके, स्वाती वाघाये, प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सफी भाई लड्डांनी, महिला जिल्हा अध्यक्ष सौ जयश्री बोरकर ताई, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, सोशल मीडिया अध्यक्ष योगेश गायधने, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, तुमसर शहर अध्यक्ष कान्हा बावनकर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, साकोली शहर अध्यक्ष दिलीप मसुरकर, देवा इलमे, स्वाती हजारे, शिवा गायधने, शंकर राऊत, धनंजय तिरपुडे, राजकपूर राऊत, महेंद्र वाहणे, स्वाती हेडाऊ, प्रकाश देशकर, आकाश बोन्द्रे, कमल साठवणे, भगवान नवघरे, सादानंद धारगावे, अनिक जमा, सोहेल अहमद, महमुद खान, गणेश निमजे, करुणा धुर्वे, अस्विनी निखाडे, ममता बिसेन, विनितकुमार देशपांडे, विजय देशकर, निखिल तिजारे, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. व यावेळी समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अटक करून सुटका करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button