राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून खा.सुप्रिया ताई सुळे यांचा सत्कार.

स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर
महिला प्रतिनिधी
पोलिस की आवाज
गेल्या दोन दिवसापूर्वी अर्थात 16 जूनला राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मुंबई कार्यालयात मिटिंग संपन्न झाली. आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी थोडयाच दिवसात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे राज्यस्तरीय 2 दिवसीय निवासी शिबीर घेण्यात येणार आहे. सदर शिबिरात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण समाजकारण व विविध मुद्द्यांवर चर्चासत्र घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. हे शिबिर आपण सर्व युवती काँग्रेस आयोजित करणार आहोत. या सर्व आयोजनाची जबाबदारी आपल्या सर्वांवर असणार आहे. हे सर्व तुमचं आहे आणि हे आपल्याला सर्वांना मिळून करावा लागणार आहे तेव्हा ते यशस्वी होऊ शकेल. त्यामुळे मला खात्री आहे की,आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवून सर्व सेल मध्ये एक वेगळं आणि अविस्मरणीय शिबीर आपल्याला घ्यायचं आहे. तुमच्या सर्वांच्या सूचना, संकल्पना विचारात घेतल्या जाणार आहे.त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला जे आवडेल, जे जमेल त्या कामाची स्वतःहून जबाबदारी घ्यावी. आपण शिबिरात कोणाला मार्गदर्शनासाठी बोलवलं पाहिजे हे देखील आपल्याला सुचवायचे आहे.
हे सर्व आपलं आहे, आपल्यासाठी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना उत्साहाने आपल्याला एकत्र येऊन कामाला लागावं .

