आरोग्य

भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:- तुमसर तालुक्यातील पाथरी गावातील आशा सेविकाच्या निवड प्रकीये मध्ये घोळ करणाऱ्या ग्रामसेवकावर कार्यवाही ची टांगती तलवार !

संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला नेटवर्क

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधिल पाथरी गावात आशा सेविका च्या निवड करिता पाथरी ग्रामपंचायत नी अर्ज मागविले नंतर अर्जदारांना मुलाखाती करिता बोलावले असता चार महिला उमेदवार ची मुलाखत वैद्यकीय अधिकारी नाकाडोंगरी, बी सी एम डोये मॅडम (सुपरवायजर), ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व सचीव यांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन गुन देण्यात आले.
त्यानंतर ग्रामसभेची तारीख जाहीर करण्यात येऊन ग्रामसभा तहकूब झाल्याने नंतरच्या ग्रामसभेत विषय क्रं.5अनुसार सचिव भलावी यांनी विषय सुचवुन चार उमेदवाचे मिळालेल्या गुनाचे वाचन करून
दोन उमेदवार चे नाव सुचविले व दोन पैकी एक उमेदवाची निवड करायची असे सांगितले पण त्यामध्ये सर्वाधिक गुन असलेल्या उमेदवाराला डवळुन कमी गुन असलेल्या उमेदवार हा आदिवासी असल्याचे सांगून ग्रामसभेतील लोकांना भ्रमीत केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी भलावी सचिव यांच्या वर करुन एकाच आदिवासी समाजाचे असल्याचा सुध्दा आरोप ग्रामस्थांनी केला.


परंतु अर्जदाराने असा जिआर असल्याची सुध्दा मागणी केले.


सचीव भलावीग्रामपंचायत सरपंच यांनी मतदान गुप्त पद्धतीने न घेता कोऱ्या कागदावर आकडे टाकून गोल करुन उमेदवाराचा नाव न लिहिता अंकावर {✓}अशी खुन करुन खुल्या कागदावर स्वतः चे बोट मांडुन वाचता लिहिता न येणाऱ्यांना ईथे खुन करा असे सचिव भलावी सांगत होते, ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतरही त्यांनी न ऐकून मतदान घेतले.


सर्वाधिक गुण मिळवलेला उमेदवार हुमेश्वरी उमेश पुष्फतोडे यांनी आरोप केला की झालेली निवड हेतुपरस्पर असुन मतदान पद्धतीने घ्यायची होती तर उमेदवाराला अर्ज भरण्यास सांगुन मुलाखतीकरिता का बोलावले?
उमेदवार हुमेश्वरी उमेश पुष्फतोडे यांनी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा ,जिल्हा वैद्यकीय अधिकारी भंडारा, खंडविकास अधिकारी प.स.तुमसर , वैद्यकीय अधिकारी तुमसर, सभापती पं.समिती तुमसर, आरोग्य सभापती जि.प.भंडारा यांना देण्यात आल्या.

. निराश उमेदवाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर न्याय मिळुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


पुढे कोणती कार्यवाही होते ह्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button