राज्य

मोबाईल चोरी करणाऱ्या टोळी ला सिहोरा पोलीसांनी केली अटक!

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्हा वार्ता
जिल्हातच नाही तर संपुर्ण जगात प्रत्येक व्यक्तीला मोबाईल ची आवश्यकता पडते कारण मोबाईल मध्ये ऑनलाइन नवनवीन बातम्या, फोन पे, ऑनलाईन क्लासेस,क्रुषी ची माहिती, मंत्रालयातील कामकाजात आवश्यकता अशा विविध कामांसाठी मोबाईल हा मनुष्याचा एक जिवलग मित्र गणल्या जात आहे. पण ह्या सर्व आवश्यक वस्तू ला सुध्दा चोरणारी सक्रिय टोळी निर्माण झाली आहे.


-सविस्तर वृत्त असे की भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथे आठवडी बाजार करण्यासाठी गेलेले व्यक्ती 1) मुरलीधर उरकुडे राह.सिंदपुरी,2)आर्यन वासनिक राम.सिहोरा,3)मुनीराज मारबदे राह.रुपेरा,4) दिलीप कुमार मेश्राम राह.सिहोरा हे सर्व आठवडी बाजार करित असतांनी आरोपी 1) बबलु महतो ,2) अजीतकुमार मंडल हे दोन्ही राह.नयाटोला महाराजपुर जिल्हा-साहेबगंज झारखंड यांनी सुना मोका पाहून यांच्या खिशात असलेले एकुण पाच मोबाईल किंमत 59 हजार 500रु चा माल चोरी करुन घेऊन गेल्याने फिर्यादी शरद बांडेबुचे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन सिहोरा येथे अप.क्रं.103/2023कलम 379भादवि अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.


पुढील तपास

माननिय लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश गोसावी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button