जागतिक हिवताप दिवस साजराजनतेचा सहभाग आवश्यक – डॉ. धीरज लांबट

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार
तुमसर येतील सु.बो. शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे 25 एप्रिल जागतिक हिवताप दिवस या वर्षीचे घोषवाक्य time to deliver zero malaria: Invest,Innovet & Implement घोषवाक्यासह साजरा करण्यात आला.

या निमित्ताने हिवताप जनजागृती प्रदर्शनी लावण्यात आली.लोकाना व विद्यार्थ्यांना हिवताप व अन्य किटकजण्य आजाराविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.

रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. धीरज लांबट म्हणाले की, शासन मोठय़ा स्तरावर आरोग्य सेवे मार्फत मलेरिया उच्चाटन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच जनतेने सुद्धा जागृत राहून व्यक्तिगत सामाजिक स्तरावर आपले परिसर स्वच्छ ठेवून कुठेही पाणी साठू देऊ नये. पाणी झाकून ठेवणे, पाणी साठवणीची भांडे आठवड्यातून एकदा घासून पुसून कोरडे ठेवणे. झोपताना मच्छरदाणी/ मच्छर अगरबत्ती चा वापर करणे, खिडक्यांना व सेफ्टीक टॅंकच्या व्हेंट पाईपला जाली लावणे. इत्यादी प्रतिबंधक उपाय करण्याचे आव्हान डॉक्टर धीरज लांबट यांनी केले आहे.


