क्राइम
भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:-तुमसर नगरपालिका मधिल आरोग्य निरक्षकाला बेधम मारपिट


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार तुमसर नगरपालिका मध्ये आरोग्य निरीक्षक मोहन वासनिक यांना दोन तरुणांनी कार्यालयात येऊन शिविगाळ करुन मारहाण करुन जखमी केले.
सविस्तर व्रुत्त असे की मोहन वासनिक नगरपालिका मध्ये आपल्या कामावर रुजु असतांना आरोपी यस. बघेल व बाबु शेंदुर्णीकर यांनी कार्यालयात येऊन माझ्या वडिलांना कामावर का घेतले असे बोलुन शिविगाळ करुन कालर पकडून मारहाण केली आणी जिवेमारण्याची धमकी दिली.

ह्या प्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणी मारहाण करुन शिविगाळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास तुमसर पोलीस करित आहेत.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. सिद्वार्थ मेश्राम यांनी “पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क” ला माहिती देतांना सांगितले कि शासकीय कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करने हि बाब अशोभनीय आहे. नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने घटनेचा निषेध करतो.



