राज्य

करमाळा सावडी येथे 8 ,मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बँक ऑफ इंडिया शाखा कोर्टी च्या व उमेद अभियानाच्या वतीने 1,07,75000 हजार रू समूहांना वाटप करण्यात आले

पोलीस की आवाज न्यूज प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक

सावडी येथे प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे फुल पुष्पगुच्छ वाहून नारीशक्ती महिला प्रभाग संघ जिजामाता महिला ग्राम संघ सावडी,राजुरी, ग्राम संघ कुंभारगाव ग्राम संघ येथील एकूण 23 समूहांना बँक ऑफ इंडिया कोर्टी च्या वतीने 1,07,75000/- रुपये वाटप करण्यात आले , कोर्टी प्रभागातील सावडी ,राजुरी व कुंभारगाव येथील समूहांनी पाहिले बँक कर्ज वेळेत परतफेड केल्याने उमेद अभियानातील स्वयं सहाय्यता समूहांना BOI कोर्टी शाखेच्या वतीने मॅनेजर सो.श्री.राहुलजी तळेकर सो यांच्या सहकार्याने आज सावडी येथे बँक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मा.श्री.योगेशजी जगताप सर (तालुका अभियान व्यवस्थापक सो), श्री.राहुलजी तळेकर सर (BOI korti branch manager ), Agri officer श्री.शैलेश शेलार सर , BMFI श्री.पोपट माने सर , प्रभाग संघ अध्यक्ष सौ.रेखा मनोहर शिंदे , ग्राम संघ अध्यक्ष श्रीमती प्रमिला सोपान जाधव (सावडी), कोशाध्यक्ष सौ.निर्मला तानाजी सोनटक्के ( कुंभारगाव), सरपंच सौ.शशिकला अंबादास जाधव , ग्राम संघ सचिव सौ.स्वाती गायकवाड( सावडी) ,ग्रामसेवक श्री.जाधव भाऊसाहेब यासर्व प्रमुख पाहुण्याच्या उपस्थिती मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून , सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच विशेष मार्गदर्शन श्री.योगेशजी जगताप सर ( BMM)व श्री.राहुलजी तळेकर सर (BOI korti branch manager)यांनी केले यावेळी उमेद अभियान ,दशसूत्री, बँक कर्ज परतफेड , विमा याविषयावर मार्गदर्शन केले व सावडी येथील हिरकणी समूहातील सौ.शारदा दादासाहेब ठेंबे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिला शुभेच्छा देऊन कविता गायन केली व महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी ICRP सौ.रेखा शेलार , ICRP सौ.निर्मला शेलार , ICRPसौ. ललिता कुंभार , ICRP सौ.शुभांगी लांडगे , ICRP सौ.पूनम नवगिरे,CAM श्री.दादासाहेब शिंदे यांचेसह ग्राम संघ पदाधिकारी , ग्राम संघ लिपिका सौ.कोमल जाधव यांचेसह उमेद स्टाफ यांनी विशेष सहकार्य करून समूहातील अध्यक्ष, सचिव , सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये बँक कर्ज वाटप करण्यात आले व जागतिक महिला दिन सर्व महिलांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button