देश

पोलीस अधिकाऱ्याने सामान्य जनतेशी प्रेमाने वागले पाहिजे- मा.राज्यपाल रमेश बैस

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मुंबई, दि. लोकशाहीमध्ये प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते व त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात. सामान्य जनतेचा अधिकाऱ्यांवर विश्वास असणे महत्त्वाचे असते व त्याकरिता अधिकाऱ्यांचे जनतेप्रति आचरण चांगले असले पाहिजे, असे सांगताना अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी प्रेमाने वागले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना केली.

भारतीय पोलीस सेवेच्या 2021 च्या तुकडीतील प्रशिणार्थी पोलीस अधिकारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रामाणिकपणे जनतेचा विश्वास संपादन करून समाजासाठी व देशासाठी काम केले तर लोक सदैव लक्षात ठेवतात; बदली झाल्यावर त्या अधिकाऱ्याचा मानसन्मान करतात. असे सांगून अधिकाऱ्यांनी आदर्श जपावे व देशाची सच्ची सेवा करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button