सामाजिक

महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित:- मा.पोलीस अधीक्षक लोहित मतानी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

राजेश ऊके( मुख्य संपादक)द्वारा प्रकाशित

भंडारा शहरात संताजी मंगल कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय महिला जागतिक दिनानिमित्त महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना

मा.लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा

यांनी महिलांनी न घाबरता निर्भय होऊन विविध क्षेत्रात समोर जाने गरजेचे आहे त्याकरिता आवश्यकता पडल्यास पोलीस विभाग तत्पर राहील आणि महिलांकडे द्रुष्ठ नजरेने पाहणाऱ्यांंना धडा शिकवण्यासाठी जेव्हा महिला युवती स्वतः अत्याचाराला बळी पडण्यापुर्वी पोलीस विभागाच्या ११२ हेल्पलाईन वर संपर्क केल्यास काही वेळात पोलीस वर्ग तिथे पोहचणार आणि महिला वर्ग सुरक्षीत राहील.

जिल्ह्यातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षीत राहील असे प्रतिपादन मा.लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे विभागीय आयुक्त कार्यालय प्रभारी उपायुक्त संघमित्रा ढोके होत्या तर

कार्यक्रमाचे उद्घाटक मा.लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा

यांच्या हस्ते क्रान्तीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आले.

प्रमुख पाहुने म्हणून मुख्यधिकारी विनोद जाधव, जिल्हा सहायुक्त चंदन पाटील, उपमुख्य अधिकारी अश्विनी चव्हाण, सौ.जाधव, नागपुर विभागिय कार्यालय कल्पना शिरपुरकर, प्रकल्प व्यवस्थापक प्रविन पडोळे, शहर संघ अध्यक्षा रंजना साखरकर, समुह संघटीका रेखा आगलावे, उषा लांजेवार ईत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button