
“पोलीस की आवाज न्यूज”वार्ता
प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक
जागतिक महिला दिन म्हणजेच स्त्रीत्वाचा उत्सव. दैनंदिन जीवनात परिचारिका, आशाताई, महिला पोलिस, शिक्षिका आणि समाजसेविका अशा विविध रूपातून लाखमोलाचं काम करणाऱ्या महिला आपल्या आधुनिक दुर्गा आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या या सर्व भगिनींचं कार्य माणूसकी जपणारं आहे.

याच माणुसकीचा गौरव म्हणून आपल्या करमाळा तालुक्यातील परिवेशात स्वतःच्या कर्तृत्वानं वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा आज दुरंदे गुरुकुलच्या वतीने सन्मान करण्यात आला. संकट काळात देश हित म्हणून अनेक महिलांनी माणुसकीचा हात पुढे केला. जीवाची पर्वा न करता, विपरत परिस्थितीत देखील समाजसेवेचा वेगळा आयाम घालून दिला ही बाब आम्हाला अभिमानाची वाटली.

आपल्या देशाला समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे. आज लाखो महिला भारतीय संस्कृतीचा समाजसेवेचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अभिमान वाटतो. माझ्या गावातील आणि परिसरातील गावातील महिलांनी जोपासलेला बंधुभाव आणि केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल आम्हाला आजच्या महिला दिनानिमित्त परिसरातील रणरागिनींचा कृतज्ञता पूर्वक सन्मान करून आनंद वाटला. आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी काढला त्याबद्दल मनःपूर्वक आभार! आपली आणि आपल्या समाजाची अशीच प्रगती होत राहो सर्वांना पुढील वाटचालीस मन: पूर्वक शुभेच्छा..!

आपला
डॉ. अमोल दुरंदे
मा. सरपंच राजुरी ग्रा. पं / संस्थापक डॉ.दुरंदे गुरुकुल




