सामाजिक

आंबेडकर वाडी संघर्ष पार्टी व विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांकरता पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा

संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी) आंबेडकरवादी संघर्ष पार्टी व विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक 31 जानेवारी 2023 ला विविध मागण्यांकरिता गांधी चौक पवनी येथून तहसील तहसील कार्यालय पवनी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आय. एल .नंदागवळी व विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला .व विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार पवनी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले .पाठवण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पवनी तालुक्यात ज्यांना राशन मिळत नाही त्यांना त्वरित देण्यात यावे , निलज ते कारधा खराब झालेले रोडवर डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे ,श्रावण बाळ विधवा महिला ,दिव्यांग ,निराधार यांना दर महिन्याला पगार देण्यात यावे ,श्रावणबाळ, विधवा
महिला, दिव्यांग, यांना वाढत्या महागाईनुसार पगार वाढ देण्यात यावे , दिल्ली सरकार राज्य प्रमाणे 200 युनिट पर्यंत महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बिल माफ करण्यात यावेत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ६ हजार रुपये महिना देण्यात यावे ,अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी निवासी मालकी हक्क पट्टे देण्यात यावे, ई श्रमिक
कार्डधारकांना ६ हजार रुपये महिना देण्यात यावा, भूमी धारकांना शेती देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा इत्यादी विविध मागण्यांकरिता मोर्चा काढण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button