मनोरंजन

अकलूज येथे राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेला येथील संग्रामसिंग मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज प्रारंभ

अकलूज येथे राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेला येथील संग्रामसिंग मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज प्रारंभ

पोलीस की आवाज न्यूज वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक

        येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त १७ व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेला प्रारंभ झाला.
     विजय चौक अकलूज येथे आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते मैदान पूजनाने करण्यात आले.

यावेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शि.प्र. मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, लक्ष्मणराव आसबे, सुभाष दळवी, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, जि. प. सदस्या सुनंदाताई फुले यांचे सह सहकार महर्षी साखर कारखाना, शिक्षण प्रसारक मंडळ,पं.समिती,जि.प. यांचे आजी-माजी सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्याधिकारी दयानंद गोरे म्हणाले, लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ आहे. अकलूज मध्ये या खेळाची जोपासना होते हे कौतुकास्पद आहे. मुलांना मोबाईल पासून अलिप्त करण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे.
प्रस्ताविकात शकील मुलाणी म्हणाले, मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाने या स्पर्धेतून आजपर्यंत सुमारे ५० हजार विद्यार्थी खेळाडू तयार केले असून या लेझीम खेळाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या स्पर्धेत प्राथमिक गट ४ संघ, ग्रामीण अ गट मुले ६, मुली८, ग्रामीण ब मुले ६, मुली १३, शहरी गट मुले ५, मुली ७ खुला गट मुले ४, मुली २ अशा एकूण ५५ संघांतून सुमारे २२०० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सन्मान केला. सदरच्या स्पर्धा दिनांक 9 व 10 जानेवारी या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होत आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाचा प्रारंभी चक्रेश्वर विद्यालय चाकोरे या संघाने आपला खेळ सादर केला. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, इलाई बागवान यांनी केले. स्पर्धेसाठी मंडळातील सर्व सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत.

        

        

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button