राजकीय

बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्या रंजू बांगर यांचे अल्पशा आजाराने निधन

भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)★पोलीस कि आवाज★ येथून जवळच असलेल्या शहापूर येथील रहिवासी रंजू संजय बांगर वय अंदाजे ४६ यांचे अल्पशा आजाराने एस. सी .जी .कॅन्सर हॉस्पिटल कळमना चौक नागपूर येथे आज दिनांक 9 जानेवारी 2023 ला ४ वाजता निधन झाले . रंजू बांगर बहुजन समाज पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या .त्याचप्रमाणे सामाजिक चळवळीत सक्रिय भाग घ्यायचे. त्यांनी आपल्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय सुद्धा मिळवून देण्याचे काम केलं. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीतील कार्यकर्ता हरपला आहे .त्यांच्यावर उद्या दिनांक 10 जानेवारी 2023 ला सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल करिता बहुजन चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व पती असून त्यांचे पती संजय बांगर बामसेफचे जिल्हा संयोजक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button