मनोरंजन

करमाळा कोर्टी: शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करमाळ्यातील सर्व शाळात असे सहशालेय उपक्रम व्हावेत-करे पाटील

पोलीस की आवाज न्यूज वार्ता प्रमिला जाधव ( पश्चिम महाराष्ट्र)सह संपादक

सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने कोर्टी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमनताई गायकवाड होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ करे पाटील, पुण्याचे उद्योजक दिलीप शिंदे,मस्कर ऍग्रो करमाळा चे कैलास मस्कर बहुजन मराठी पत्रकार संघच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला अभंग जाधव उपस्थित होते.याप्रसंगी गणेशभाऊ करे पाटील यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये असे सहशालेय उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमापूजनाने व दिप प्रज्वलनाने झाली.याप्रसंगी रवींद्र दवणे यांनी गायलेल्या सावित्रीबाईंच्या कवितेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शाळेचे माजी विद्यार्थी स्वप्निल जाधव सहाय्यक पोलीस अधीक्षक यांचे आई वडिल श्री व सौ जाधव यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बालगीते,कोळीगीते,लोकगीते,लावण्या,नाटके सादर केली. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला कोर्टी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मनमुराद दाद दिली व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत जवळपास एक लाख रुपयांच्या बक्षिसांची लय लूट केली.प्रशासनाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील केंद्रप्रमुख आदिनाथ देवकते,अमृत सोनवणे,प्रवीण बांगर छत्रपती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम उपस्थित होत्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कोर्टी,छत्रपती शिवाजी विद्यालय कोर्टी शिक्षक वृंद तसेच युथ फाऊंडेशन कोर्टी यांनी मोलाचे सहकार्य केले.


या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सचिन नवले आणि गणेश अभंग यांनी आपल्या मधुर वाणीने केले.कार्यक्रमाचे आभार श्री संतोष महाडिक यांनी मानले.

चौकट एक
याप्रसंगी युवक नेतृत्व आशिष गायकवाड यांनी शाळेला वॉटर फिल्टर,वॉटर कुलर व सीसीटीव्ही भेट दिले.उद्योजक दिलीप शिंदे पुणे यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला.

चौकट दोन
यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री गणेशभाऊ करे पाटील यांनी शालेय विकासासाठी पंचवीस हजार रुपयांचा चेक दिला,तसेच मस्कर ऍग्रो करमाळा चे श्री कैलास मस्कर यांनी अकरा हजार रुपये रोख बक्षीस दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button