शालेय

विदर्भ जुनिअर कॉलेज टीचर असोसिएशनची त्रिवार्षिक निवडणूक सभा संपन्न

नागपूर( संजीव भांबोरे ) विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर असोसिएशनची त्रिवार्षिक निवडणूक सभा दिनांक 8 जानेवारी 2023 रावसाहेब ठवरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवीन बाबुळखेडा नागपूर येथे संपन्न झाली. यामध्ये विदर्भातील केंद्रीय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची सर्वसामतीने बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे अकोला, महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर नागपूर ,उपाध्यक्ष डॉ .ज्ञानेश्वर गौपाले भंडारा ,उपाध्यक्ष प्राध्यापक रोमेंद्र बोरकर गोंदिया, उपाध्यक्ष प्राध्यापक रमेश खाडे अमरावती ,उपाध्यक्ष प्राध्यापक शिवराम बावस्कर बुलढाणा ,संघटन सचिव प्राध्यापक धर्मेंद्र मुनघटे गडचिरोली ,संघटन सचिव प्राध्यापक रवींद्र कावरे अमरावती ,सहसचिव प्राध्यापक डॉ. अभिजीत पोटले नागपूर ,सहसचिव प्राध्यापक डी. एस. राठोड अकोला ,सहसचिव प्राध्यापक रंगराव लांजेवार यवतमाळ ,सहसचिव प्राध्यापक अनिल काळे वाशिम ,कार्यालयीन सचिव प्राध्यापक मनीष तंबाके नागपूर, कोषाध्यक्ष प्राध्यापक विनय काळे अमरावती, असे एकूण 15 केंद्रीय कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. निवडणुकीचे कामकाज निर्णय अधिकारी म्हणून प्राध्यापक अरविंद मंगळे अमरावती व प्राध्यापक सूर्यकांत भोंगळे नागपूर यांनी काम पाहिले. अध्यक्ष व महासचिव यांनी निवडणुकीनंतर विचार मांडताना सांगितले की, संघटनेची बांधणी हा प्रमुख उद्देश असेल. उपस्थित सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार प्राध्यापक शशिनिवास मिश्रा यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button