करमाळा ज्योतीक्रांती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मोफत प्रशिक्षण आयोजक करण्यात आले होते गेल्या 15, दिवसापासून यात विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले

“पोलीस की आवाज न्यूज “वार्ता *प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक*
करमाळा ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था करमाळा व ज्ञानज्योती महिला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिवणकाम प्रशिक्षण यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सेवा भवन हॉलमध्ये संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अभियान भारत समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत, मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर, व बहुजन मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रमिलाताई जाधव ,हे कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलत करण्यात आले कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा निशिगंधा शेंडे यांनी प्रस्ताविक केले तर गणेशभाऊ करे पाटील ,संतोष राऊत ,प्रमिलाताई जाधव, यांनी मनोगत तर मंजिरी जोशी, यांनी एकपात्री नाटक सादर केले यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थे मार्फत व यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल प्रशिक्षणार्थींना देण्यात आले या कार्यक्रमासाठी शंकर अनिल शेंडे, मीराताई शेंडे ,विक्रम राऊत, सह १०० महिला उपस्थित होत्या व प्रत्येक महिलेने प्रशिक्षणाद्वारे शिकलेला अनुभव व्यक्त केला व कार्यक्रम पारण्यासाठी अनिल शेंडे, निशिगंधा शेंडे, नम्रता शेंडे, अनिता राऊत ,यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता राऊत यांनी केले तर आभार नम्रता शेंडे यांनी मांडले




