राजकीय
विरोधी पक्षनेते अजीत पवार यांच्या व्यक्तव्यावर तुमसर भाजपा तर्फे जाहीर निषेध

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-नागपुरात हिवाळी अधिवेशनात अजीत पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक नसुन फक्त स्वराज्य रक्षक होते त्यांना धर्म रक्षक म्हणने चुकीचे आहे, असे धर्म विर छत्रपती संभाजी महाराजाबद्दल अजीत पवार यांनी अपमानास्पद व्यक्तत्व केले. ह्या निषेधार्थ भाजपा ग्रामीण व शहर तर्फे महिला आघाडी तुमसर, भाजपा युवा मोर्चा तुमसर यांच्या नेत्रुत्वावाखाली जुना बस स्ट्यान्ड चौक येथे आंदोलन करुन हजारो कार्यकर्ते नि निषेध केला.
ह्यावेळी सर्वश्री प्रदिप पडोळे(माजी नगराध्यक्ष),मा.शिशुपाल पटले,काशिरामजी टेंभरे,मुन्ना फुंन्डे, पंकज बालपांडे, सौ.गिता कोंडेवार, कल्यानी भुरे, प्रिती मलेवार, कुंदा वैध्द आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

