राज्य
पोलीस भरतीसाठी उमेदवार भंडारा पोलीस मुख्यालयी दाखल

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क पोलीस वार्ता:-राज्यातील सुशिक्षित बेरोजगाराचा लक्ष लागलेल्या पोलीस सिपाई व चालक पदाची भरती प्रक्रिया सोम.२ जाने.पासुन सुरु झाली आहे.

पोलीस भरती साठी जिल्ह्यातील ११७जागा असुन यात सिपाई पदाच्या६१आणी चालक पदांच्या५६जागांचा समावेश आहे. त्यासाठी एकुण ७८६८अर्ज दाखल झाले आहेत.
मैदानी चाचणी ला२जाने.पासुन ते१०जाने.पर्यंत पोलीस मुख्यालयी मैदानात सुरु झाली असुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक मा.ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, अमलदार भरती प्रक्रियेसाठी तैनात आहेत.




