प्रधानमंत्री रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्त्याची चौकशी करा -सुवर्णा रामटेके पंचायत समिती सदस्या
प्रकरण कन्नड गाव -सिरसाळा ते सेलारी रोड डांबरीकरण व छोट्या छोट्या पुलाचे बांधकाम
जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा ( ऑल इंडिया प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत कन्नड गाव -सिरसाळा ते सेलारी रोडचे डांबरीकरण व छोट्या छोट्या पुलाचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य सुवर्णा रामटेके यांनी केलेला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून दिलेले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत डांबरीकरण व छोट्या छोट्या पुण्याचे बांधकाम करण्यात येत असून निकृष्ट दर्जाच्या डांबराचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे छोट्या छोट्या पुलाचे बांधकाम करीत असताना निकृष्ट दर्जाचा सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. जुन्या रस्त्यावरून डांबरीकरण करताना माती ,मुरूम स्वच्छ करण्यात येत नाही व त्यावरच डांबरीकरण केले जाते .त्यामुळे रोड दोन-तीन दिवसातच उखडून जातो. त्याचप्रमाणे डांबरीकरण रोडची दबाई केल्या जात नाही.
याबाबत तेथील मनोज गिरडकर पेवर आपरेटर यांच्याशी तेथील पंचायत समिती सदस्य सुवर्णा रामटेके व तेथील नागरिकांनी विचारणा केली असताआपण मला विचारणारे कोण अशाप्रकारे उद्धट भाषेत त्यांच्याशी व्यवहार केला. त्यामुळे वरील प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे .अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.




