राजकीय

नागपूर येथील अधिवेशनावर बहुजन समाज पार्टीच्या आक्रोश मोर्चाने सत्ताधारी पक्षासहित विरोधी हैराण

नागपूर (संजीव भांबोरे) बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने इंदोरा मैदान नागपूर येथून आज दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी सरकारच्या विरोधात नागपूर विधान भवनावर निघालेल्या आक्रोश मोर्चात महाराष्ट्रातील लाखो बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते ,मोठ्या संख्येने बहुजन समाज पार्टीचे निळे बॅनर ,ध्वज, घेऊन मोर्चात सहभागी झालेले होते. या मोर्चात 70 वर्षाच्या वृद्ध महिला सहित तरुण ,युवा ,नवजवान, पुरुष ,महिला यांनी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा सहभागी झालेले होते. बसपाच्या निळ्या ध्वजाने संपूर्ण नागपूर शहर निळे झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे यांनी केले.या आक्रोश मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये नागपुरातील अंबाझरी उद्याना लगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या नियोजित स्मारकासाठीची जमीन काहीजणांनी संगणमत करून खाजगी बिल्डरला दिली तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भवनांची वास्तू अवैधरित्या उध्वस्त केले आहे असे कट कारस्थान रचणाऱ्या व अवैधरित्या भवन उध्वस्त करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून पूर्वनियोजित प्रमाणे त्याच जागी नव्याने भवन निर्माण करण्यात यावे, वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी स्मारक व आंतरराष्ट्रीय शोध केंद्राचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, टेका नाका मेट्रो स्टेशनला मान्यवर कांशीरामजी, गड्डी गोडाम स्टेशनला तुकारामजी साखरे, रहाटे कॉलनी दीक्षाभूमी व वर्धमान नगरातील मेट्रो स्टेशनला आंबेडकर मेट्रो स्टेशन अशा एकेरी नाव ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात यावे, भीमा कोरेगाव प्रकरणातील निरअपराध आंबेडकरी तरुणांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, मुंबई इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम करीत पूर्ण करण्यात यावे ,महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महापुरुषांच्या अपमान करणारी वक्तव्य केले आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्वरित मंत्रीपदावरून बरखास्त करण्यात यावेत ,ईव्हीएम मशीन बंद करण्यात येऊन बॉयलट पेपर द्वारे मतदान घेण्यात यावे ,धाणाला हमीभाव देण्यात यावे, जिल्हा परिषद व महानगरपालिकेद्वारे बंद करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा सुरुवात करण्यात यावेत ,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, निराधार जेष्ठ नागरिकांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता नियमित देण्यात यावे , अभयारण्य लागून असलेल्या गावांना गॅस पुनर्भरण अनुदान अनुदान नियमित देण्यात यावी, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ,स्लम बस्तीतील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देऊन नागरी सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये गरजूंना मिळणाऱ्या अनियमित सोयी सुविधा व मोफत औषध उपचार वाटपातील अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवण्यात यावे ,नागरी रहवाशी क्षेत्रातील आठवणी बाजारात मनपा हद्दीच्या बाहेर नेण्याचे छोटे यंत्र थांबविण्यात यावे ,अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या वहिवाटीची जमीन नियमित करून त्यांच्या नावावर करावी आणि त्यांची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर सातबारावर करावे, ग्रामीण भागात आजही लाखो कुटुंबांना हक्काची घरे नाहीत मिळेल त्या जागेवर त्यांची आपली झोपडी बांधलेली आहेत असे अतिक्रमणधारक कुटुंबाचे सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना घरकुल बांधण्याची शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, मे 2021 चा शासन निर्णय रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे ,

दादर शिवाजी पार्क येथील ६ डिसेंबर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांचा छळ करणाऱ्या तसेच बाबासाहेबांचे फोटो असलेले निळा झेंडा उतरवणाऱ्या माधोरी पोलीस ठाणेदार सतीश कसबे, मनोज पाटील व श्री कासार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे .

,शासकीय मान्यताप्राप्त एमबीबीएस व अन्य मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेत संविधानिक आरक्षण कमी करण्याच्या विरोधात बहुजन आक्रोस आंदोलन ओबीसी आरक्षण 27% वरून 8.95 एससी आरक्षण १३ टक्केवारीवरून 6.16, एसटी आरक्षण ७ टक्के वरून 3.31% केल्याबद्दल शासनाच्या सर्व विभागात आरक्षणानुसार रिक्त आणि भरलेल्या जागांचा तपशील आकडेवारी दरवर्षी सार्वजनिक करण्यात यावा, थेट जनतेतून सरपंच ,नगराध्यक्ष निवडण्याचे प्रयोग हे भारतीय संविधानिक लोकशाहीच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात असल्याने अशी निवडणूक प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरण ठेवलेण्यात यावे शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्यात यावा ,महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, त्या दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या वारसांना प्राधान्य देण्यात यावे ,इत्यादी मागण्यांचा समावेश करण्यात आला . मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजने ,माजी खासदार अशोक सिद्धार्थ, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, सुनील डोंगरे प्रदेश प्रभारी, प्रशांत इंगळे प्रदेश प्रभारी, कमलेश चलवादी प्रदेश प्रभारी, मनीष कावळे प्रभारी, संजय मेश्राम नागपूर जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव विजयकुमार डहाट प्रदेश सचिव, शंकर भेंडारकर प्रदेश सचिव उपस्थित होते .

यावेळी बहुजन समाज पार्टीचे , महेंद्र रामटेके ,नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट प्रदेश सचिव ,पृथ्वी शेंडे, रंजनाताई ढोरे ,संदीप मेश्राम, बाबुर्डे शाहबान खान ,राहुल सोनटक्के प्रिया गोंडाने, शाबाद खान ,प्रताप सूर्यवंशी, शितल नाईक, रुपराव नारनवरे, जितेंद्र घोडेस्वार,
इब्राहिम टेलर, नरेंद्र संजय बुर्वेवार ,सौ वंदना चांदेवार, वैशाली नारनवरे ,मंगला लांजेवार ,वीरंका भिवगडे ममता सहारे भंडारा जिल्हा महासचिव,डॉ. संघरत्ने ,शंकर भेंडारकर , पंचायत समिती सदस्य सुवर्णा रामटेके, अरविंद धारगावे, के .ल. गजभिये, दिलीप मोटघरे, पारमित मोटघरे, बालाजी लांजेवार ,निमाताई मोहरकर भंडारा गोंदिया लोकसभा प्रभारी, लता संजीव भांबोरे , ,अमित तिरपुडे , शालिक सोनटक्के, प्रिया सहारे, संजय नासरे ,यशवंत वैद्य, .व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button