राज्य

पुण्यातील नवले ब्रिज या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या पाहणी दरम्यान खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे अतिक्रम कारवाईला वेग

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक

मुंबई बेंगलोर महामार्गावरील नवले ब्रिज आणि या ठिकाणी येण्याच्या एन एच आई च्या चुकीच्या रोडच्या बांधणीमुळे होणारे रोडचे अपघातात जवळजवळ शंभर लोकांचा मागील काही वर्षापासून मृत्यू झाला असाच अपघात 20 तारखेला संध्याकाळी नवले ब्रिज या ठिकाणी घडला आणि जवळजवळ 48 गाड्यांचे नुकसान झालं बारा लोक जखमी झाली या सर्व गोष्टीची दखल मुख्यमंत्र्यांपासून खासदार आमदार जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा तसेच हायवे अथॉरिटी या सर्वांनी घेतली आणि या ठिकाणी असलेली चुकीची अतिक्रमण रस्त्यावरील रमलर पट्टे आणि वाहतूक विभागाचे व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्या त्याच्यावर आज पासून या ठिकाणच्या दुकानांच्या अतिक्रमण हटवण्याचे काम आज नवले ब्रिजच्या आजूबाजूच्या नरे भागातील आंबेगाव परिसरातील वडगाव परिसरात जोरदार पद्धतीने सुरू झालं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना उशिरा का होईना परंतु सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी जी जाग आली त्याकरता त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button