राज्य

भारतीय क्रांतिवीर लहुजी साळवे यांची 228 वी जयंती पहेला या ठिकाणी साजरी

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) भंडारा तालुक्यातील पहेला या ठिकाणी क्रांतिवीर लहुजी साळवे यांची 228 वी जयंती मातंग समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली आहे .यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज ,क्रांतिवीर लहुजी साळवे , छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीत पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर वार्ड गावातील प्रमुख मार्गाने रॅली सुद्धा करण्यात आली. रॅलीचे समारोप ग्रामपंचायत च्या मुख्य गेट द्वार जवळ करण्यात आले .यावेळी प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप कठाळे म्हणाले की, मातंग समाजाने आज एकत्र होण्याची गरज आहे व सर्व मिळून आपण अन्यायाच्या विरोधात लढण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी प्रामुख्याने सांगितले व बाबासाहेबांनी आपल्याला सर्व अधिकार आपल्या संविधानात दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या अधिकाराची लढाई आपण लढावी यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. प्राध्यापक सुरज गोंडाने यांनी लहुजी साळवे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या पूर्वजांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरंदर किल्ल्याच्या रक्षणासाठी खर्ची घातले असे सांगितले .त्याचप्रमाणे संजीव भांबोरे यांनी आज भारतीय संविधान जिवंत असल्यामुळे आज आपण सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आहोत त्यामुळे संविधानाचे संरक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दीपक वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजयजी कठाळे अध्यक्ष लहूसेना नागपूर हे उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक सुरज गोंडाने यांनी लहुजी साळवे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडले व अनेक लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान केले. त्याचप्रमाणे संजीव भांबोरे यांनी आज आपण भारतीय संविधानामुळे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आहोत .त्यामुळे संविधानाची संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी प्रामुख्याने सांगितले. यावेळी विचार मंचावर म्हणून यावेळी प्रामुख्याने प्राध्यापक सुरज गोंडाने उपाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा, माजी जिल्हा परिषद सदस्य यामिनीताई बांडेबुचे ,संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नरेंद्रजी रामटेके, वामन शहारे, उल्हास हरडे, दिलीप ढगे, विकास बोरले ,गणेश डोके दिलीप तायवाडे ,मंगेश तायडे चंद्रशेखर खराबे, अनंतकुमार बावणे, उमरेड ,रमेशजी खडसे, पद्माकर बावणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता माजी सरपंच सुनील शेंडे ,कवळू खंडाळे, दवडू खंडाळे, संजय शेंडे, देवानंद वानखेडे, नितीन शेंडे ,भाले गुरुजी ,पंकज खंडाळे ,ज्ञानेश्वर खंडाळे, जगन बावणे, अनिकेत बावणे, मंदा वानखेडे ,शालिनी शेंडे, संतोषी खंडाळे ,अर्चना बावणे, प्रतिभा बावणे दुर्गा बावणे ,कांता खंडाळे, कुलदीप गंधे, विलास बांडेबुचे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button