राज्य

अवधूत विद्यालय वांगी नंबर दोन येथील मुख्याध्यापक श्री वनवे सर यांचे शाळेतील कामाकडे दुर्लक्ष ; गावक-यांनी केली पहाणी

पोलीस की आवाज न्यूज प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक

22 ऑगस्ट ला लेखी संमती घेऊन मुख्याध्यापक वनवे सर यांनी कुठलाही बदल केला नाही, त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची निवेदन केले.
श्री वनवे सर यांनी पंधरा दिवसाची मुदत मागता पुढील सर्व कामे मी करून घेतो असे गावातील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते ते पुढील प्रमाणे कामे करण्याची होती पंधरा दिवसात मुला मुलींचे शौचालय दुरुस्त करणे, खेळाचे साहित्य उपलब्ध करणे, शाळेचा आहार उत्कृष्ट दर्जेचा देणे, SMDC बोर्ड शाळेत लावणे, संगणक प्रयोगशाळा पंधरा दिवसात वापरण्यासाठी उपलब्ध करणे, SMDC एस एम डी सी समिती पंधरा दिवसात स्थापन करणे, रजेवर जाताना चार्ज असिस्टंट कडे देणे ही सर्व कामे करुन घेईन अश्या प्रकारची आश्वासने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती दत्तू अण्णा रणसिंग तसेच ग्रामपंचायत सरपंच सतीश चौधरी, उपसरपंच बशीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुनील ढावरे, सुरेश जाधव, गणेश जाधव चेअरमन, नामदेव महाडिक, हनुमंत भानवसे, नामदेव सपकाळ, राहुल रणसिंग, प्रकाश खराडे, अशोक खराडे, अभिमान खराडे, रमेश खराडे, धनंजय खराडे, बाळू महाडिक, बापू साळुंखे, संभाजी मुळे, बाळनाथ रणसिंग, बबन तकिक ,बिबीशन ताटे, अशोक तकिक ,राजेंद्र सातव, अमोल सातव ,नितीन जाधव ,काका जाधव समाधान महाडिक, रोहिदास माने ,प्रवीण जाधव, ऋषिकेश ताटे, बबलू रणसिंग ,अमोल सातव इत्यादी ग्रामस्थांना दिले होते त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापक श्री वनवे सर यांनी पंधरा दिवसाची मुदत मागता सर्व कामे मार्गे लावीन व नाही काम पूर्ण झाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल असे त्यांनी सांगितले होते परंतु २२ ऑगस्टला लेखी संमती देवुन ही शाळेतील कामकाजात वनवे यांनी दुर्लक्ष केले आहे असे सर्व ग्रामस्थांच्या मनात नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button