शालेय

जिल्हा परिषद शाळा आष्टीची शिष्यवृत्ती परिक्षेत गगन भरारी…

आष्टी: राजेश ऊके(मुख्य संपादक)महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे द्वारे आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत तुमसर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आष्टीने उत्तुंग भरारी घेतली आहे.
सदर परिक्षेत पाच पैकी चार विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत
पात्र विद्यार्थ्यांमध्ये अनुराग प्रल्हाद गोपाले, अमित रविशंकर नोनारे, राशी देवेंद्र चौधरी, व प्रिन्सी शांताराम हटवार यांचा समावेश आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक श्री. के.आर . कुऱ्हाडे, मार्गदर्शक शिक्षक श्री. आर . बी काळसर्पे, श्री . एम. डी. जांभूळे, मुख्याध्यापक श्री. एस.जी. खंडाईत , श्री. जी.ए. शनिचरे, कु. एम.बी.गधवार, श्री. ए.पी. गोपाले यांना दिले.
सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ किशोर जी गोपाले, उपाध्यक्ष प्रदिप जी घुमे, सुनील जी शेंडे, व भारतीय जीवन विमा अभिकर्ता अरविंद जी गोपाले व समितीचे सर्व सदस्य यांनी पात्र विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button