महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत जाहीर करावी :- पंकज वानखेडे राज्य उपाध्यक्ष , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ची मागणी

संजीव भांबोरे ( ऑल इंडिया प्रतिनिधी ) :::
महाराष्ट्र येथे तसेच पूर्व विदर्भ येथे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. भंडारा जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात शेतकरी बांधवांचे खरिप हंगामाचे उभे पिक वाहुन गेल्याने आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमीनीवर मोठमोठे खड्डे पडल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. पुन्हा त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नसल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक गेले आहे. धान – तांदुळ , मूग, उडीद, मका, तसेच इतर ही पिके
पाण्याखाली गेले असून कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असुन कधी न भरून निघणारे आर्थिक नुकसान झालेले आहे. पावसान जमिनीत मोठ्या प्रमाणात तण उगवल्यामुळे पेरणीला विलंब होणार आहे. खरिपाचे उत्पन्न अद्याप ती उठलेले नाही. त्यामुळे तण काढणे, पेरणीसाठी बियाणे व खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे संकट समोर आहे. जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकान्यांनी झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावें. असे मागणी प्रे संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे .जेणे करून
नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकर मदत होईल. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता तातडीने उपाययोजना करावी ,

