गोबरवाही पोलीस ठाण्याला लाभलेले सर्वोत्तम ठानेदार मा. दिपक पाटील! -ग्रामस्थांची भावना



★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★गोबरवाही पोलीस स्टेशन हे जिल्ह्यातील टोकाला मध्यप्रदेशच्या सिमेला लागुन असलेला पोलीस स्टेशन आहे.
ह्या क्षेत्रात आदिवासी लोकवस्ती असणारे मोठी हद म्हणून गोबरवाही पोलीस स्टेशन ची ओळख आहे..
मा.दिपक पाटील सा.यांनी तरुण बेरोजगार मुलामुलींना स्पर्धा परिक्षा चे प्रशिक्षण दिले आणी गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाचणालय मध्ये स्पर्धा परिक्षेचे पुस्तके सुद्धा वाटप केले.
महिला सुरक्षा कडे त्यांनी विशेष लक्ष दिले ,महिलांना समाजात वावरताना त्यांच्यामधील भितीचे वातावरण दुर केले.
मा.लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात जाऊन गावातील लोकांना मार्गदर्शन करुन शांती व सलोख्याचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे पोलीस स्टेशन हद्दीतील त्यांच्यावर ग्रामस्थांचे विश्वास बसलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या नजरेस मा.ठानेदार दिपक सर्वात उत्कृष्ट थानेदार ठरलेले आहेत.
