माढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता करमाळा प्रतिनिधी प्रमिला जाधव(सहकारी संपादक★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★)
गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे , त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
माढा तालुक्यातील सततच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे तरी, दारफळ म्हैसगाव माढा , कुर्डूवाडी हे सर्कल पंचनाम्यातून वगळण्यात आले,
तरी सर्व सरकलांचा पंचनाम्यात समावेश करण्यात यावा माढा तालुक्यात सरासरी पावसापेक्षा जास्त प्रमाणात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,
डाळिंब केळी द्राक्षे इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे समन्वयक पंडित साळुंखे यांनी माहिती दिली तालुका अध्यक्ष अमोल केसरे, उपसरपंच बालाजी नाईकवाडे विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रवीण लोकरे अजित मोरे युवराज तांबिले इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच राजेंद्र लोकरे इत्यादी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

