क्षमतांचा विकास करणे हेच खरे शिक्षण
पठान ईम्रान, भराडी ता.सिल्लोड जि. औरंगाबाद
प्रतिनिधी (पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)

राम भोगले
—————————- सरस्वती भुवन प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांनाचा सत्कार संपन्न
-–————————–
भराडी ता सिल्लोड जिल्हा औरंगाबाद(प्रतिनिधी) पठाण इम्रान पोलीस की आवाज न्यूज अध्ययनाच्या रूढ पद्धतीत काळानुसार बदल करण्याची गरज असून नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भूत उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करणे हेच खरे शिक्षण असल्याचे प्रतिपादन सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले यांनी केले
येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेत आयोजित दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगीं अध्यक्षीय समारोपा ते बोलत होते
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र
राज्याचे सेवानिवृत्त संचालक सुनील चौहान, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अरुण मेढेकर, शालेय समितीचे अध्यक्ष नरेंद्र अग्रवाल, सदस्य सुभाष साखला, यांच्यासह मुख्याध्यापक गणेशसिंग गौर , मानद मुख्याध्यापक सुभाष साळवे,उपमुख्याध्यापक युवराज पाडळे, पर्यवेक्षक संजय दाभाडे आदींची उपस्थिती होती
पुढे बोलताना भोगले म्हणाले, की,पोटापाण्यासाठीच केवळ शिक्षण हा समज चुकीचा आहे.आयुष्य यशस्वीपणे जगण्यासाठी विविध कौशल्येआत्मसात करणे गरजेचे आहे.नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा
विकास करणे हेच खरे शिक्षण होय.म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता विकसित कराव्यात.क्षमताधिष्ठित समाज निर्माण झाला की आपोआपच आत्मनिर्भर
भारताची निर्मिती होईल.असे सांगून जो न थकता आनंदाने काम करतो तो यशस्वी होतो असे स्पष्ट केले
यावेळी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बोटॅनिकल गार्डन, शेती शाळा, ग्रंथालय प्रदर्शन, औषधी वनस्पती प्रदर्शन , विज्ञान प्रयोग प्रदर्शन , राष्ट्रीय सेवा योजना आदी विविध विभागाच्या आयोजित प्रदर्शनाचे उदघाटनही करण्यात आले. विज्ञान विभागाची पीपीटी व प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या उच्च कलाकृती पाहून मान्यवर प्रभावित झाले.
सर्व मान्यवरांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार सजवलेल्या वर्गांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवादही साधला
यावेळी चौहान यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नूनगंड न बाळगता वेळेचे गणित आखत केलेल्या आत्मविश्वासपूर्वक परिश्रमामुळे यश निश्चित मिळते.गुणवंत होण्याबरोबरच ज्ञानवंत होण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वाढवावी. भारतीय संस्कृतीचा तसेच आई, वडील, शिक्षक यांचा आदर बाळगण्याचे शेवटी त्यांनी आवाहन केले
मेढेकर यांनी,विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत करत शाळा व संस्थेचा नावलौकिक करावा असे स्पष्ट केले
यावेळी भक्ती चौथे व अभिषेक मोरे या गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले
परितोषिकांचे वाचन श्रीमती कमल सोनवणे, व प्रा तानाजी मादळे यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेशसिंग गौर यांनी केले स्वागतगीत अश्विनी राकडे व तिच्या चमूने सादर केले सूत्रसंचालन प्रा प्रशांत अपसिंगेकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक संजय दाभाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले




