देश
खासदार संजय राऊत यांची जामीन अर्जावरील सुनावणी १०आँक्टोंबर पर्यंत वाढविली

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-खासदार संजय राऊत मुंबईतील १हजार ०३४कोटी च्या पत्राचाळ पुर्ण विकासासाठी झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले असुन यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी १०आँक्टोंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. ह्या सुनावणी वेळी खा.संजय राऊत हे न्यायालयात उपस्थित होते त्यावेळी त्यांच्या वकिलाचा युक्तिवाद पुर्ण झाला. यानंतर सुनावणी पुढे ठकलण्यात आली असुन त्यांचा दसरा सन न्यायालयीन कोठडीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे.




