राज्य

भाई नितीन काळे चंद्रभागा नदित घेणार जलसंमाधी

प्रकरण भाविक भक्तांसाठी कमी वजनाचा लाडू पुरवठा करणे

संजीव भांबोरे
सोलापूर (ऑल इंडिया प्रतिनिधी )विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर व विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी कार्यकारी अधिकारी गजानन गुरव साहेब हे जो विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला भाविक भक्तांसाठी लाडु प्रसाद पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून जो कमी वजनाचा लाडु पुरवठा केल्याने वजन व मापे विभागाने छापा टाकून तथ्य आढळुन आल्याने देखील अटी व शर्ती नुसार कार्यवाही न केल्याने व संबंधित टेंडर प्रक्रिया रद्द न केल्याने व कारवाईस टाळाटाळ करत असल्याने दिनांक 7 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे एकादशी दिवशीच चंद्रभागेच्या नदित जलसंमाधी घेणार असल्याचे भाई नितीन काळे यांनी सांगितले.. नितीन काळे हे गेल्या अनेक महिन्यांपासून जो अन्याय झाला आहे व मापात पाप करून लाडु पुरवठा करणाऱ्या संस्थेने लाखो भाविक भक्त व वारकऱ्यांची व लाखो रूपयांची फसवणूक केल्याने संबंधित टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत .. संबंधित संस्थेला पाठीशी घालण्याचे काम विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव साहेब यांच्या व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात नितीन काळे हे उपोषणाला बसले होते व रात्री दोन वाजता संबंधित अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले कि आम्ही अटि व शर्ती नुसार आम्ही पंधरा दिवसात कार्यवाही करू व टेंडर प्रक्रिया रद्द करू असे आश्वासन देऊन आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केले .. पंधरा दिवस होऊनही कोणत्याही प्रकारची अद्याप कार्यवाही केली नाही व संबंधित संस्थेला पाठीशी घालण्याचे काम विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी गजानन गुरव साहेब हे करत आहेत असे नितिन काळे यांनी सांगितले व न्याय मिळत नसल्याने आपण एकादशीच्या दिवशीच चंद्रभागेच्या नदित जलसंमाधी घेणार आहोत असे नितीन काळे यांनी सांगितले. आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई ,विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे, जिल्हाधिकारी साहेब सोलापूर ,अध्यक्ष /कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापूर ,प्रांत अधिकारी सोलापूर, पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर, प्रेस मीडिया यांना पाठविलेल्या लेखी निवेदनातून केली आहे याबाबत प्रशासन व मंदिर समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button