भंडारा शहरात दिनदहाडे गोलीबार



राजेश ऊके, (मुख्य संपादक,पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता* मिळालेल्या माहितीनुसार भंडारा शहरात 3सप्टेंबर2022रोजी 3.00ते 3.30दरम्यान अतुल बाळकृष्ण वंजारी वय 30वर्षे रा.गणेशपुर भंडारा येथील रहिवासी असुन स्व. अन्नाजी कुलकर्णी वाचणालय भंडारा येथे अभ्यास करण्याकरिता हजर असतांना आरोपी गंगाधर नारायण निखारे वय42वर्षे रा.पद्मा वार्ड पवनी याने देशी कट्याद्वारे फायर करुन अतुल वंजारी याला गंभीर जखमी केले. जखमी वंजारी याला सामान्य रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान जखमी चा म्रुत्यु झाला.
सविस्तर व्रुत्त असे आरोपी व जखमी यांच्यामध्ये2020मध्ये वादविवाद झाला असून सदर प्रकरणाची पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा ची नोंद करण्यात आली होती. त्या जुण्या वादाचे राग मणात घेऊन आरोपी ने सदरची घटना केली असल्याचे पोलिसांना लक्षात येत आहे.
गुन्हा चा तपास पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी सा.व अपर पोलीस अधिक्षक मा.अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भंडारा बारसे सा.व पोलीस स्टेशन चे बिट अमलदार करीत आहेत.




