राजकीय

संभाजी ब्रिगेड भंडारा जिल्हाध्यक्षपदी विनोद वट्टी यांची निवड

संजीव भांबोरे
भंडारा (ऑल इंडिया प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड भंडारा जिल्हा पद नियुक्त व जिल्हा आढावा बैठक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय अध्यक्ष शिवश्री विश्र्वास बडवाईक व मार्गदर्शक शिवश्री शिशुपाल भुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .

या बैठकीमध्ये शिवराय -फुले -शाहू -आंबेडकर -बिरसा मुंडा यांच्या विचारधारेचे पाईक, सामाजिक प्रश्नावर सतत संघर्ष करणारे, विविध आंदोलनाच्या माध्यमातून समस्या मार्गी लावणारे शिवश्री विनोद वट्टी यांची सर्वानुमते संभाजी ब्रिगेड भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे जिल्हा माहासचिवपदी शिवश्री गणेश नंदनवार, विधी अभ्यासक, प्रखर वक्ते युवा नेतृत्व करत असलेले शिवश्री राकेश सिंदेगणसूर यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाउपाध्यक्ष पदी सामजिक तथा राजकीय कर्याची जाण असलेले शिवश्री. यशवंत भोयर तर जिल्हा संघटक पदी माजी सरपंच शिवश्री दिनेश निंबार्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या .

महाराष्ट्रामध्ये नव्यानेच संभाजी ब्रिगेड- शिवसेनेची युती झाली असून या अनुषगाने महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या बैठक व दौरे सुरू आहेत त्याच अनुषंगाने भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात हा सोहळा पार पडला. आज शिवश्री विनोद वट्टी यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली असून या पदाला न्याय देताना संभाजी ब्रिगेड- शिवसेना युवतीच्या माध्यमातून होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था पुर्ण ताकतीने लढू व संभाजी ब्रिगेडचे कार्य घर तिथे कार्यकर्ता,गाव तिथे शाखा हा उद्देश ठेवून व सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी लढा देण्याचे कार्य करणार असे आश्र्वासन याप्रसंगी दिले. या निवड प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष शिवश्री विश्र्वास बडवाइक ,मार्गदर्शक शिवश्री शिशुपाल भुरे, शिवश्री विजय बालपांडे , शिवश्री शशिकांत देशपांडे ,शिवश्री सुदाम बोरकर , शिवश्री गुणवंत झंझाड, शिवश्री सुजीत गजभिये , यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका, शहराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button