अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर सम्राट अशोक सेनेच्या वतीने काढण्यात आला मोर्चा
प्रकरण पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली महारांचा बैल नको यावरून वृद्ध महिला व वयोवृद्ध पुरुषांना गावगुंडांनी केली मारहाण



संजीव भांबोरे
अकोला- (ऑल इंडिया प्रतिनिधी )आज दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी, सम्राट अशोक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आकाश दादा शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना, निवेदन देऊन बुलढाणा जिल्हा,तालुका मेहकर,मोळा मोळी गाव येथे,अतिशय निंदनीय घटना महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली,महाराचा बैल तोरणाखाली नको म्हणत बौध्द वृध्द महिलांना, वयोवृद्ध पुरुषांना जातीयवादी गावगुंडांनी केली जबर मारहाण केली
पोळा सणानिमित्त सर्व गावकरी पोळा साजरा करत होते,तोरणाखाली महाराचा बैल नको म्हणत काही जातीयवादी गावगुंडांनी विरोध केला,जातीयवादी शिवीगाळ करत काठ्याने मारहाण करण्यात आली,व्हिडिओ मधील लाल शर्ट आणि पांढरा शर्ट काळी पँट असे दोघे तिघे दिसत आहेत,अनुसूचित जातीच्या वृद्ध,
महिलांना मारलेले दिसत आहे,उघड उघड यात बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केलेला आहे,
जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे,बड्या जातीयवादी लोकप्रतिनिधीचे हे कार्यकर्ते आहेत. त्यांना जातीची,सत्तेची मस्ती चडलेली आहे,आमच्या आया बहिणींना खाली पाडून मारहाण केली जात आहे. या घटनेचा सम्राट अशोक सेना निषेध करत असून पोलीस अधीक्षकाने तात्काळ या जातीयवादी गावगुंडांना अटक करावी. त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत ,दंगली घडवून आणणे,307,354 विनयभंग अंतर्गत कार्यवाही करावी.पीडितांना बौध्द वस्तीला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे सर्व गावातील भीतीच वातावरण पसरलेला आहे,बौद्ध वस्तीला तात्काळ संरक्षण देऊन सर्व घडलेल्या प्रकारातील आरोपांना तात्काळ अटक करावे अन्यथा याच्यापेक्षा मोठा तीव्र आंदोलन सम्राट अशोक सेनेच्या वतीने छेडण्यात येणार आहे असा सम्राट अशोक सेनेच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे .आंदोलनामध्ये उपस्थित सर्व कार्यकर्ते व भीमसैनिक उपस्थित होते, रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी प्रत्येक भीमसैनिकांनी आपल्या माय बहिणीला न्याय देण्यासाठी उपस्थित राहिलाच पाहिजे. असे सुद्धा आकाश दादा शिरसाट यांनी सांगितले.




