Uncategorizedजिल्हा
वाहतूक नियंत्रणाचे नियम मोडल्यास कठोर कार्यवाही-मा.लोहित मतानी ,पोलीस अधीक्षक भंडारा


*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता*:- काही दिवसांपूर्वी नव्यानेच रुजु झालेले पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन ला भेट देऊन आढावा घेतला आणीवाहतूक नियंत्रणात भर दिला व वाहतूक नियंत्रणाचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई चे निर्देश देण्यात आले.
त्यांनी पहिल्यांदा पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रण नियम तोडणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांच्यावर कार्यवाही केली .
तसेच सर्व जनतेला आव्हान केले की बिना हेल्मेट, त्रिपल सिट, राँग साईड, ऱ्यास ड्रायव्हिंग,सिट बेल्ट न बांधल्यास ह्या सर्व नियमांचा पालन न करणाऱ्या व्यक्ती वर कठोर कारवाई करण्यात येईल.
तसेच भंडारा जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था चे कठोरपणे पालन करु असे सांगितले.



