कृषी

तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना ओलीत पिकांची भरपाई देऊन पीक विमा जाहीर करावा–
माजी आमदार चरण वाघमारे

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल

पोलीस कि आवाज
भंडारा-जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे धान पिकासह इतर सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने अशा सर्वच शेतकऱ्यांना ओलीत पीक नुकसानभरपाई देऊन सोबतच पीक विमा योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.
भंडारा जिल्हा हा धान्याचा कोठार म्हणून प्रसिध्द असुन तुमसर व मोहाडी तालुका हा वैयक्तिक सिंचनाचे साधन तसेच पेंच प्रकल्प, खिंडसी तलाव, बावणथडी सारख्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने दोन्ही तालुक्यातील बहुतांश शेतकरी मिरची, वांगे,चवळी, कारले, अशा इतर पिकासह धान पीकमोठया प्रमाणात घेतात. त्यामुळेच दोन्ही तालुके बारमाही सिंचनाखाली येत असल्याने याही वर्षी धानासह इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असतांनाच ऑगस्ट महिन्यात एकदा नव्हे तर दोन-तीनदा सर्वत्र मुसळधार पावसाने सततची हजेरी लावल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुका जलमय होऊन समुद्रासारखे रूप प्राप्त झाले होते.त्यामुळेच सर्व पिके पाण्याखाली येऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी दुबार तर काहींनी तीबार लागवड करुन सुध्दा पुरामुळे काहीच शिल्लक राहिले नाही.शेवटी शेतकऱ्यांना पोटाची खडगी कशी भरावी?दुबार, तिबार पेरणीसाठी, व पेरणीपूर्वी मशागती करीता खाजगी सावकार तसेच ईतर शासकीय व निमशासकीय बँकेचे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी?असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीची तीन प्रकारात विभागणी केली असली तरी तुमसर व मोहाडी ही दोन्ही तालुके बारमाही सिंचनाखाली येत असुन यापूर्वी मावा तुडतुड्यामुळे धानाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीत शेतीची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्याच निकषांचे आधारे आताही ओलीत पीक नुकसानीची नोंद घेऊन आर्थिक मदत द्यावी. त्याच बरोबरच दोन्ही तालुक्याला ओला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करून पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा अशी मागणी विकास फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्य शासनास केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button