राज्य
गोबरवाही प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा मध्ये दूषित पाणी चा पुरवठा…

नागरीक त्रस्त…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत 5 ते 6 गावात पिण्याच्या पाण्याचा वाटप केल्या जाते. ह्या प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत घरोघरी नळाला येणारा पाणी दुषीत येत असतो. त्यामुळे नागरिक पोटाचे विकार व त्वचा रोग घशाचे विकार ह्या सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावरील अधिकारी आणि पदाधिकारी यांनी शासनाला फिल्टर प्लांट चा प्रस्ताव पाठवण्यात यावे जनेकरुन जनतेला शुद्ध पाणी पिण्यासाठी योग्य होईल.



