कॉपर चोर 9 आरोपी पोलीसांच्या ताब्यात…
गोबरवाही पोलीसांची मोठी कार्यवाही
संपुर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर 1 न्युज नेटवर्क
पोलीस कि आवाज न्युज
गोबरवाही वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते पोलीस कर्मचाऱ्यांसह परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पाथरी ते कवलेवाडा झुडपी जंगल परिसरात काळ्या रंगाचा केबल वायर काटतांना आरोपी दिसून आल्याने आरोपी ला विचारले असता त्यांनी सांगितले की भरवेली मॉईन बालाघाट येथुन मॉईल परिसरात ठेवलेला काळा रंगाचा केबल चोरी करुन माल स्कारपियो गाडी मध्ये भरून मौजा हिरापुर हमेशा जंगलामध्ये घेऊन आले आणि चोरी केलेल्या केबल च्या वरील प्लास्टिक कॅव्हर काढतांना मिळुन आल्याने आरोपी शुभम परबते चिखला, रिहान मेश्राम शंकर पिपरिया ता. खैरलांजी जिल्हा. बालाघाट, विक्रांत झोळे बोनकट्टा, शुभम टेकाम चिखला, गंगा शेंदरे चिखला, भाग्यवान गहाने चिखला, सुमित कंगाली चिखला, अजय देरकर बोनकट्टा, उमेश काळसर्फे हिरापुर आणि फरार आरोपी शमिर शेख चिखला यांच्या ताब्यातून 100 किलो कॉपर तार बंडल अंदाजे 80,000 रु., एक काळ्या सिल्व्हर रंगाची मोटर सायकल कि. 60,000 रु आणि पांढऱ्या रंगाची स्कारपियो गाडी अंदाजे कि. 6,00000 रु असा एकुण 7,40,000 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करुन कलम 305(ई), 329 3(5) , भा. न्या. स. कलम अनवे सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि गिते, व पोलीस कर्मचारी यांनी केली असून पुढील तपास गोबरवाही पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.




