राज्य
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

भंडारा: जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 3 सप्टेंबर,2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस परिवहन विभाग,पोलिस प्रशासन,सार्वजनिक बांधकाम विभाग,आरोग्य विभाग तसेच इतर संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्ययातील वाढते अपघाताचे प्रमाण,अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना,वाहतुकीचे
नियमन,रस्त्याची देखभाल व सुधारणा,तसेच जनजागृती उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील एकूण 6 Black Spot चे ठिकाण असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या आवश्यकत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



