हातभट्टी दारू काढणारा आरोपी ला जिल्हा कारागृहात रवानगी…

M.P.D.Aअंतर्गत जिल्हा कारागृहात रवानगी
वरठी/भंडारा वार्ता:-मोहाळी तालुक्यातील मौजा वरठी येथील रहिवासी सचिन पशिने मागील 5 वर्षापासून हातभट्टी मोहफुल दारू काढून विक्री करण्याच्या व्यवसायात सक्रिय असुन हातभट्टी वाला व्यक्ती ह्या नावाची ख्याती प्राप्त केली होती. त्याच्या वर वरठी पोलीस स्टेशन मध्ये दारू काढने व विकने असे अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्या ह्या कृत्यामुळे वरठी पोलीस स्टेशन परिसरातील अनेक तरुण युवक दारू च्या व्यसनी मुळे गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परीणाम होऊन प्रचंड दहसत निर्माण झाली आहे. अशा व्यक्ती वर अंकुश लावणे गरजेचे होते.

अशा गुन्हेगारांना कायद्याच्या कसोटीत बसवुन गुन्ह्याचे अंत करणे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात आरोपी सचिन पशिने याच्या विरुद्ध M. P. D. A कायद्यान्वे प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी भंडारा श्री. सावनकुमार यांनी स्थानबद्ध करुन जिल्हा कारागृह भंडारा ईथे रवानगी करण्याचे आदेश दिले.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात नितीशकुमार चिंचोलीकर स्था. गु. शा. व वरठी पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी केली.



