वाळु बुकिंग केली असल्यास 31 ऑगस्टपर्यंत वाळु उचल करावी
—खनिकर्म विभाग भंडारा
भंडारा,दि.29 : महाराष्ट्र शासन वाळू धोरण दिनांक 16 फेब्रुवारी 2024नुसार भंडारा जिल्ह्यातील कार्यान्वित मौजा- पांजरा रे, उमरवाडा, बेटाळा, निलज बु.गुडेगाव, शिवनाळा, इटगाव, नांदेड असे एकुण 08 डेपोधारक यांचेकडील शिल्लक असलेल्या वाळुसाठा 1 महिन्यामध्ये 24 तास विक्री व वाहतुक करण्याकरीता आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार सामान्य नागरिक, घरकुलधारक, शासकीय बांधकाम व इतर बांधकाम व्यावसायिक या सर्व ग्राहकांना सुचित करण्यात येते की,या डेपोमधुन वाळु बुकिंग केली असल्यास या डेपोमधुन दिनांक 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाळु उचल करुन घेण्यात यावी. ही वाळु उचल करण्यास ग्राहकांनी विलंब केल्यास आपण स्वत: जबाबदार राहाल. ही वाळु बुकिंग केलेल्या रक्कमेबाबत प्रशासन जबाबदार राहणार नाही याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा खनिकर्म विभाग (उप जिल्हाधिकारी) यांनी कळविले आहे.




