पोलीस अधीक्षक नुरुल हसन ठरले भंडारा जिल्हाचे सिंगम…

भंडारा जिल्हा वार्ता:-मा.नुरुल हसन साहेब भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ह्या पदावर रुजू होताच वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध धंद्यावर अंकुश लावले.

पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांनी एक वर्षाच्या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन व कर्मचाऱ्यांवर बारकाईने नजर ठेवून कर्तव्य पार पाडत असतात. मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलीसांनी जुन महिन्यात तिन भयानक गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन जिल्हा बाहेर काढले आहे. या कार्यवाही चा उद्देश गुन्हेगारी ला रोखने आणि शातंता व सुव्यवस्था राखण्यासाठी सार्वजनिक सुव्यवस्था सुनिश्चित करने आहे. आतापर्यंत चालू वर्षात एकुन 56 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक हसन साहेबांचा मुख्य उद्देश भंडारा जिल्ह्यातील सर्व जनतेला न्याय मिळो आणि कानुन व्यवस्था सुनिश्चित राहावी.



