मुन्ना पुंडे यांचे आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन…
भंडारा जिल्हा वार्ता:-भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संवाद मेळावा आले ह्यावेळी भाजपा भंडारा जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे यांनी भंडारा जिल्ह्यातील आदिवासी समाज व दुर्गम भागातील समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या मागण्या मागीतल्या. १) वन जमिनीवर होणारे अतिक्रमण सुधारीत नियम २०१२ चे सुधारित नियमानुसार वनहक्क पट्टे वाटप करण्यात यावे. २)तुमसर तालुक्यातील आदिवासी १२ गावात राजीव सागर द्वारे पाण्याची सोय उपलब्ध करुन द्यावे. ३) तुमसर तालुक्यातील २२ गावांना महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत गर्रा बघेडा ईथे २२ कोटी ची योजना पुर्ण झाली परंतु २२ गावात पण पाणी पुरवठा झाला नाही हि योजना सुरु करण्यासाठी पाठपुरावा करावा. ४) तुमसर तालुक्यातील दुर्गम भागातील गाव गारकाभोंगा, कारली, आसलपाणी, मोठागाव असुन ह्या गावात पुरेसा मॅग्निज उपलब्ध आहे जर ह्या गावात मॅग्निज खदान उपलब्ध केली तर त्या गावातील लोकांना रोजगाराची भरपूर संधी मिळेल त्याकरिता ह्या आदिवासी गावात मॅग्निज खदान उपलब्ध करून द्यावे. असे निवेदन आदिवासी मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना देण्यात आले.

