आनंद बुद्ध विहार ठाणा येथे बुद्ध जयंती साजरी
भंडारा: द रजिस्टर बुद्धीष्ठ सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने त्रिगुण वैशाख पौर्णिमा
तथा बुद्ध पौर्णिमा दि.15 मे गुरुवारला आनंद बुद्ध विहार ठाणा जवाहर नगर इथं साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात आनंद बुद्ध विहार येथे सामूहिक बुद्ध वंदना सकाळी 8 : 00 वाजता घेण्यात आली.
तद्नंतर बौद्ध बांधव, बौद्ध भगिनी यांनी 8:45 वाजता रॅली काढण्यात आली, रॅलीत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आधी जे 27 बौद्ध होऊन गेलेत त्यांचे छायाचित्र प्रत्येक बौद्ध बांधव व बौद्ध भगिनी यांच्या कडे होते.

मिरवणूक आनंद बौद्ध विहार ठाणा पासून सुगत बुद्ध विहार परसोडी पर्यंत काढण्यात आली. 10:15 वाजता सुगत बुद्ध विहार परसोडी येथे पोहोचली. मिरवणुकीत असलेल्या बौद्ध बांधव व बौद्ध भगिनी यांना लिंबू पाणी देण्यात आले. त्यानंतर 10:40 वाजता सुगत बुद्ध विहार परसोडी पासून आनंद बुद्ध विहार ठाणा येथे पोहोचून 12 वाजता मिरवणुक संपन्न झाली.
मिरवणूक प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.


बुद्ध पौर्णिमा अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर बौद्ध, कार्यक्रमाचे उद्घाटक सुधीर बौद्ध, प्रमुख अतिथी वासुदेव बौद्ध, राहुल बौद्ध, शिल्पा बौद्ध, उद्धव बौद्ध, राजकुमार बौद्ध, प्रमुख पाहुणे नरेंद्र मेंढे सर, शिलवंत रंगारी सर, गोस्वामी, राजेश ऊके पोलीस कि आवाज न्युज, व आनंद बुद्ध विहार ठाणा ट्रस्टचे अध्यक्ष दीनदयाल देशभतार, ठाणा येथील बुद्ध उपासक व उपासिका
मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोलीस जवाहर नगर पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी सुध्दा उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वतन बौद्ध यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर बौद्ध यांनी केले.
धम्मपाल बौद्ध जिल्हा प्रतिनिधी भंडारा



