जिल्ह्यातील नळ योजनेसह शाळा व अंगणवाडी मधील स्त्रोतांची होणार तपासणी

1 एप्रिल ते 30 जून कालावधीत जिल्हाभरात पाणी तपासणी अभियान
अभियानात सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळवे यांचे आवाहन
भंडारा,दि.1: एप्रिल पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करून नागरिकांना शुध्द स्वच्छ गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात दि. 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत नळ योजनेसह शाळा, अंगणवाडी मधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. या अभियानात ग्राम पंचायतस्तरीय यंत्रणांनी सहभागी होऊन स्त्रोतांची रासायनिक तपासणी वेळेत पूर्ण करावी असे आवाहन
भंडारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी गावस्तरावरील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करून नागरिकांना शुध्द स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. ग्राम पंचायतस्तरावरील जलसुरक्षकांमार्फत उपविभागीय प्रयोग शाळा भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखांदूर व पवनी येथे पाणी नमुने गोळा करून तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल ते 30 जून 2025 या कालावधीत पावसाळापूर्व रासायनिक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या निर्देशीत केलेल्या कालावधीत नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्याचे राज्यस्तरावरून निर्देश देण्यात आले आहे.