राज्य

वनमंत्री ना, गणेश नाईक यांचे हस्ते अप्पासाहेब निकत यांना सुवर्ण पदक व सन्मान पत्र प्रदान

दिनांक 21 मार्च 2025 रोजी ना. गणेश नाईक, वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते वन सेवेतील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी अप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना राज्यस्तरीय सुवर्ण पदक (Gold Medal) व सन्मान पत्र प्रदान करून गौरवण्यात आले. सदर कार्यक्रम अपर मुख्य सचिव (वने ) श्री मिलिंद म्हैसकर, वन बल प्रमुख श्रीमती शोमिता बिस्वास, वरिष्ठ वन अधिकारी व राज्यातील वन कर्मचारी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये नवी मुंबई येथे दिमाखदार सोहळयात पार पडला.


वन सेवेतील प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने श्री अप्पासाहेब निकत (IFS) यांना राज्यस्तरीय सुवर्ण पदक ( Gold Medal) दिनांक 11 मार्च चे शासन निर्णय द्वारे जाहीर केले होते. त्याचा राज्यस्तरीय पदक वितरण सोहळा नवी मुंबई येथे जागतिक वन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना. गणेश नाईक यांचे हस्ते संपन्न झाला.


आप्पासाहेब निकत हे रायगड जिल्ह्यात जिल्हा वन अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी 50 लक्ष नवीन वृक्ष लागवड, 1कोटी रोपे निर्मिती, नवीन आधुनिक रोपवाटिका, जैवविविधता वन उद्यान, निसर्ग पर्यटन केंद्र निर्मिती केले. त्याच बरोबर वन प्रचार प्रसिद्धी, वन वणवा रोखणे, समुद्री कासव, गिधाड व दुर्मिळ वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न केले. विविध गुन्ह्यामध्ये वन तस्कर व वन्यजीव तस्कर यांना अटक करून वाहनेही जप्त करून शासन जमा केली. रायगड व रोहा संवर्धन राखीव क्षेत्राची नवीन निर्मित
केली.कन्या वन समृद्धी योजना, शेत जमीनी वर वृक्ष लागवड योजना, राष्ट्रीय हरित सेना इत्यादी मार्फत वन विस्तार साठी उल्लेखनीय कार्य केले.
तसेच जंगलात मृद व जल संधारणाची कामे मोठया प्रमाणात करून भूगर्भ जल पातळी वाढविणे आणि वन्य प्राण्यासाठी पाणवठे तयार करुन जल, जंगल व प्राण्यांचे संवर्धनाचे महत्वपूर्ण कार्य केले.
आप्पासाहेब निकत यांनी “अटल आनंदवन घनवन” हे पुस्तक लिहून वन विस्तारासाठी मोलाचे कार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button