आरोग्य
आरोग्य मंत्री यांना निवेदन…
भंडारा वार्ता:-तुमसर तालुक्यातील आष्टी गावातील सुनिता सोयाम( गरोदर माता ) उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने त्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि तुमसर उपजिल्हा रुग्णालयात स्री रोग तज्ञ जास्त वाढविण्यात यावे या अनुषंगाने गोंडवाना कृती संघर्ष समिती चे अध्यक्ष विकास मरस्कोल्ले, उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद परतेती, सचिव हरिप्रसाद वाढीवे व अशोक उईके (आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन) व समिती चे सदस्य यांनी तहसीलदार तुमसर मार्फत मा. आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांना निवेदन देण्यात आले आणि उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे N.S.U.I ब्लड बॅक I. C. U सामान उपलब्ध असुन सुद्धा सुरू झालेली नाही याची सुरुवात सात दिवसात करण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे.
