करमाळा साहित्य मंडळ करमाळाचे राज्यस्तरीय “बुधभूषण”पुरस्कार जाहीर,
पोलीस की आवाज न्यूज, प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक.
करमाळा तालुका साहित्य मंडळ यांचे कडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय “बुधभूषण” साहित्य पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आलेली असून उत्कृष्ट कविता संग्रहासाठी दिला जाणारा पुरस्कार हा कवी इंद्रजित पाटील (बार्शी) यांच्या “कळ पोटी आली ओठी” या काव्यसंग्रहास तर उत्कृष्ट गझल संग्रहासाठी दिला जाणारा हा मारोती मानेमोड यांच्या “निर्गुण निराकार” या गजल संग्रहास घोषित करण्यात आला आहे.. राज्यभरातून मागवून घेतलेल्या काव्य संग्रह व गझल संग्रहातून या दोन पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे.

या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक ह. भ. प. ऍड.डॉ. श्री बाबूराव हिरडे, मंडळाचे अध्यक्ष कवी श्री. प्रकाश लावंड, उपाध्यक्ष प्राचार्य नागेश माने, सचिव डॉ. सुनिता दोशी, खजिनदार गझलकार नवनाथ खरात तसेच कवी दीपक लांडगे, कवी खलील शेख,श्री. बाळासाहेब गोरे, श्री. नाथाजीराव शिंदे, श्री. मोरेश्वर पवार, श्री. दिग्विजय देशमुख, कवी श्री. नारायण सोरटे, श्री. प्रा. हनुमंत जाधव, डॉ. राजेशकुमार जाधव,कवी दादासाहेब पिसे, श्री. अंगद बिडवे,कवयित्री सौ.प्रणिता काटुळे,कवयित्री सौ. स्वाती माने,कवी संतोष कांबळे,प्रा. सौ. अश्विनी निकत, कवी डॉ. शैलेश देवकर,कवयित्री प्राची सरवदे, कवी तेजस धेंडे, कवयित्री ऋतुजा वीर, कवयित्री ऋतुजा सरतापे, कवयित्री मुक्ता काळे,कवयित्री गौरी खरात यांच्यासह या पत्रकार परिषदे वेळी
मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.लवकरच या पुरस्काराचे वितरण करमाळा येथे करण्यात येईल..