Uncategorized

माढा : गाव कामगार तलाठी कार्यालयाचे कामकाज दुसऱ्या गावी न करता कन्हेरगांव तलाठी कार्यालयातच करा – आप्पा लोखंडे

सोलापूर – गाव कामगार तलाठी कार्यालयाचे कामकाज टेंभुर्णी शहरात न होता कन्हेरगांव येथे कार्यरत करण्यात बाबत बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने माढा तहसीलदार यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे की गावातील नागरिकांना टेंभुर्णी येथे ये जा करण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे गरजू नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच कन्हेरगांव येथे ऑनलाईन कामकाजासाठी नेटवर्क नसल्याने आजपर्यंत तलाठी कार्यालयाचे कामकाज टेंभुर्णी येथे सुरू होते परंतु आता सध्याच्या परिस्थितीत कन्हेरगांव येथे नेटवर्कची सुविधा गावात उपलब्ध असल्याने कन्हेरगांवातील नागरिकांच्या वतीने व बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने माढा तहसीलदार व कन्हेरगांव तलाठी भाऊसाहेब यांना गाव कामगार तलाठी कार्यालयाचे कामकाज टेंभुर्णी येथे न करता कन्हेरगांव येथील तलाठी कार्यालयात करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button