नाकाडोंगरी गावात महिला जागतिक दिवस साजरा…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात महिला जागतिक दिवस साजरा करण्यात आला. जिवनजोती महिला ग्रामसंघ व जिजाऊ महिला ग्राम संघ तसेच ग्रामपंचायत नाकाडोंगरी यांच्या सहकार्याने महिला जागतिक दिवस हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक स्पर्धा घेण्यात आल्या व बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे
अध्यक्ष माजी सरपंच सारिकाताई कोटपल्लिवार तसेच उद्घाटक वैद्यकीय अधिकारी वनश्री बडवाईक मॅडम कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दिपीका गौपाले सभापती पं. स. तुमसर

तसेच भाविका ऊके, प्रिती घडले, राधिका सोनवाने, प्रिया रामटेके, मीराबाई ऊके, अर्चना गौपाले, प्रिती तुरकर, रोशनी बोरकर, बिंदू ऊके, पोर्णिमा दहाट, माया घडले, वैशाली राऊत, कविता राऊत, नेहा गजभिये, विनोदा गजभिये, रत्नशिला पंचभाई, रखुबाई गौपाले, शुशिला वासनिक तसेच दोन्ही ग्राम संघाचे पदाधिकारी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि गावातील सर्व समुहातील महिला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

ह्या कार्यक्रमाचे संचालन जोती गजभिये तसेच आभार प्रदर्शन भाविका ऊके यांनी केले.




